Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

रेल्वे अर्थसंकल्पामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ‘पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्यानुसार, दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास सुमारे 58 कोटी 75 लाख 48 हजार रुपयांची आणि अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

अन्य वर्षांच्या तुलनेत यावर्षीची तरतूद अत्यंत कमी आहे. तर 1212 कोटी रुपये खर्चाच्या पुणे-संगमनेर-नाशिक नव्या मार्गासाठी तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हा मार्गही रखडणार आहे.

दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या 247 किलोमीटर लांबीच्या या दुहेरीकरणाच्या कामावर दोन हजार 350 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, 2021-22 या वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

या मार्गाचे विद्युतीकरण झाले असून दुहेरीकरण झाल्यास मनमाड-पुणे अंतर साडेतीन-चार तासांनी कमी होणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणार्‍या काही रेल्वेगाड्या या मार्गाने वळविता येतील.

शिर्डी, शनिशिंगणापूर, पंढरपूर, तिरुपती ही तीर्थक्षेत्रे एकमेकांना रेल्वेने जोडणे शक्य होणार आहे. शिवाय नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणार्‍या रेल्वे वाहतूक मार्गातील दौंड-मनमाड रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. हा मार्ग एकेरी वाहतुकीचा असल्याने यावरील रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू असते.

शिर्डी व शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी या मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक असल्याची मागणी होती.

शिवाय असे झाल्यास प्रवासी व मालवाहतुकीस त्याचा फायदा होईल, असे म्हणणे केंद्र सरकारकडे मांडले गेले होते. त्यामुळे 2015 मध्ये केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या सर्व्हेसाठी नऊ कोटी 37 लाख रुपयांची तरतूद केलेली होती.

यातील विद्युतीकरणाचे काम आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. गत अर्थसंकल्पात 250 कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण यंदा तशी कमी झाली. त्यामुळे उद्दिष्टाप्रमाणे दुहेरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होणार आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close