अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या रोमिओचे नागरिकांनी केले ‘हे’ हाल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात आज भर दुपारी अडीच वाजता घडला आहे. या रोडरोमिओची नागरीकांनी चांगलीच धुलाई केली.  मुलीला कॉलेजला जात असताना हा रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा.

आजही हा रोमिओ छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा. पाठलाग करण्यासारखे ही प्रकार होत होते. आजही हा रोमिओ मुलीचा पाठलाग करत होता. त्यावेळी त्याने मुलीला त्रास दिला.

या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यावेळी या रोमिओने दम भरला. त्यावेळेस तिच्या मदतीला आजूबाजूचे नागरिक धावून आले आणि रोमिओला चोप दिला. स्थानिक नागरिकांनी तोफखाना पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी रोमिओला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.

ताब्यात घेतलेला रोमिओ हा नशेत असल्याचे पुढे येत आहे. राज्यात मुलींच्या आणि महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment