१०० किलोमीटर प्रवासासाठी फक्त ६० रुपये खर्च… चीनची ही खास कार भारतात होणार लॉंच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शुक्रवारपासून सामान्यांना ऑटो एक्सपो २०२० खुला झाला आहे, दरम्यान दोन दिवसांत ५० पेक्षा जास्त गाड्यांचे लाँचिंग झाले असून ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या विविध कार्स या प्रदर्शनात मांडत असते.

हायमा बर्ड या चीनच्या कंपनीने भारतात हायमा इलेक्ट्रिक ई 1 लाँच करणार आहे, याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असू शकते. हायमा बर्ड ची हीच ई 1 ईव्ही इलेक्ट्रिक कार चीनमध्ये Aishang EV 360 या नावाने विकली जाते.

चीनच्या बाजारपेठेत ही सर्वात स्वस्त आणि मस्त अशी एक आरामदायक इलेक्ट्रिक कार आहे. हरियाणाच्या मानेवारमध्ये या कारचे दाेन माॅडेल तयार हाेत असून. जे पुढील दीड वर्षात बाजारात येतील.

यामध्ये दाेन एअरबॅग्ज अाहेत. १०० कि.मी.च्या प्रवासासाठी केवळ ६० रुपये खर्च हाेतील असा कंपनीचा दावा आहे. डिजाइन बद्दल सांगायचे झाल्यास Haima E1 EV मध्ये एलईडी हेडलैम्प्स,

ड्युअल टोन पेंट स्कीम, अलॉय व्हील और ब्लैक केबिन थीम डिजाइन यासह टचस्क्रीन सिस्टम, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि क्लाइमेट कंट्रोल सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment