कांदा @ १८०० रुपये

Published on -

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर आता दोन हजारांपर्यंत आले आहेत.

राहुरी बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलाव घेण्यात आले. या लिलावात एक नंबर कांद्याला सरासरी १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

काही दिवसांपासून राहुरी बाजार समितीत कांद्याचे दर कमी होत आहेत. शुक्रवारी लिलावात एक नंबर कांद्यास १ हजार ४७५ ते १ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दोन नंबर कांद्यास प्रति क्विंटल ८०० ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. या वेळी १५ हजार ३६२ गोण्या कांदा आवक होती.याआधी वांबोरी बाजार समितीतील लिलावातही कांद्यास १ हजार ८०० रुपये भाव मिळाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!