पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे.

दरम्यान आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. “पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स” द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले “पुण्यश्लोक अहिल्यादेवी” या हिंदी आणि मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. नुकतीच या चित्रपटाचे पोश्टर लॉंच करून घोषणा करण्यात आली.

अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या.

त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. धर्म, संस्कृती परंपरा यांचा त्यांनी कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृद्ध केले.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment