राज्य सरकारने फुकटचा धंदा करू नये – अजित पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे :- दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करण्याच्या योजनेवर सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये असा सल्ला त्यांनी पुण्यात दिला. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज पुरविण्यची योजना राज्य सरकारच्या विचारधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

तसेच याबाबत ग्राहक संघटनांशी चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. ही योजना वर्षाखेरपर्यंत लागू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. असा निर्णय झाल्यास या योजनेसाठी दरवर्षी 7 हजार 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून महावितरण आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार, असा प्रश्न उभा राहीला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोफत वीज मिळणार, की हे नवे गाजर ठरणार अशी चर्चा सुरु झाली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment