Ahmednagar NewsBreakingHealth

अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण; जाणून घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती, किती धोकादायक?

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत.

या व्हायरसविषयी सातत्याने येत असलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुणी सांगतंय होमियोपॅथीने या करोना आजारावर मात करता येईल तर काही जण म्हणतात यावर औषधच नाही. सोशल मीडियावर तर या करोना विषाणूबाबत अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत. कोरोना विषाणू म्हणजे काय, हा कसा पसरतो आणि संक्रमण कसे होत आहे, तसेच त्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या…

१ कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना प्रत्यक्षात विषाणूंचा एक मोठा समूह आहे, जो प्राण्यांमध्ये सामान्यपणे आढळतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचला. नवीन चिनी कोरोनो व्हायरस हा सार्स विषाणूसारखा आहे. या संसर्गामुळे ताप, सर्दी, धाप लागणे, सर्दी होणे, घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे न्युमोनियादेखील होऊ शकतो. याची स्थिती मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) आणि सेव्हल एक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एसएआरएस) सारखीच आहे. यापूर्वी हा विषाणू डिकोड करणार्‍या हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरोलॉजिस्ट लिओ पून यांना वाटते की, हा आजार आधी एखाद्या प्राण्यात आला असावा, नंतर तो मानवापर्यँत फैलावला.

२ हा कसा पसरतो

कोरोना व्हायरस (सीओव्ही) एक झुनोटिक आहे. याचा अर्थ असा की, तो 2019-nCoV द्वारे प्राण्यांतून मानवांमध्ये पसरला आहे. असे मानले जाते की 2019-nCoV सीफूड खाऊन पसरला होता. पण आता कोरोना विषाणू माणसापासून माणसापर्यंत पसरत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्याशी संपर्क झाला, तर संक्रमणाचा धोका आहे. खोकला, शिंका किंवा हात थरथरणे ही साधारण लक्षणे आहेत. एखाद्या संक्रमित व्यक्तीस स्पर्श करणे आणि नंतर त्यांच्या तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्श करणेदेखील व्हायरस संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

३ कोरोना विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे

डोकेदुखी, वाहणारे नाक, खोकला असणे, घसा खवखवणे, ताप येणे, अस्वस्थता, शिंका येणे, दम्याचा त्रास वाढणे, थकवा येणे

४ किती धोकादायक ?

या विषाणूमुळे मरणाऱ्यांचे सरासरी वय 73 वर्षे आहे. मृतांपैकी सर्वात वयस्क व्यक्ती 89 वर्षांची होती, तर सर्वात कमी वयाचा व्यक्ती वयाच्या 48 व्या वर्षी मरण पावला. कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये वाहणारे नाक, खोकला, घसा खवखवणे, अधूनमधून डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश आहे, जो काही दिवस टिकू शकतो. दुर्बल प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांसाठी ते घातक आहे. वृद्ध आणि मुले याचा सहज बळी पडतात. न्यूमोनिया, फुप्फुसात सूज येणे, शिंका येणे, दमा होणे ही लक्षणेदेखील आहेत.

५ कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी हे करा…

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोलने हात स्वच्छ करून आपले हात स्वच्छ पुसा.

खोकला किंवा शिंका येत असताना आपले नाक आणि तोंडाल मास्क लावा.

सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क साधण्याचे टाळा.

मांस आणि अंडी चांगले शिजवा.

जंगलात आणि शेतात राहणाऱ्या प्राण्यांशी असुरक्षित संपर्क साधू नका.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close