या कारणामुळे काश्मीरमध्ये पुन्हा इंटरनेट बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीनगर : संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी मोहम्मद अफझल गुरूला फाशी देण्याच्या घटनेला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रविवारी मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

अफझल गुरूच्या फाशीविरोधात काही अलिप्ततावादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे हिंसाचार घडण्याची शक्यता होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद ठेवण्यात आली होती.

जवळपास सहा महिने उलटल्यानंतर गेल्या २५ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये प्रशासनाने टू-जी इंटरनेट सुरू केले. आता अफझल गुरूला सुळावर चढविल्याच्या दिनी पुन्हा एकदा इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली.

कुख्यात प्रतिबंधित ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ने (जेकेएलएफ) अफझल गुरूच्या फाशीच्या निमित्ताने रविवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिसांनी जेकेएलएफविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिथावणीखोर संदेश पसरविले जाऊ नये.तसेच खोऱ्यात हिंसाचार घडू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे पाऊलसुद्धा प्रशासनाने उचलले आहे. 

Leave a Comment