Ahmednagar NewsCrime

शेतातील उभ्या पिकासह झाडे व पाइपलाइन पेटवली

राहुरी :- तालुक्यातील मंडलिकवस्ती येथील शेतातील उभ्या पिकासह झाडे व ठिबक सिंचनची २१०० फुटांची पाइपलाइन अज्ञात व्यक्तींनी पेटवली. त्यामुळे नुकसान झाले. या प्रकरणी खंडू पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. शिंदे यांची वांबोरी-डोंगरगण मार्गावर डोंगराच्या पायथ्याशी शेतजमीन आहे. या जमिनीत मठाचे पीक काढणीसाठी आले होते. तेथे आवळ्याची झाडे व ठिबक सिंचन संच पसरवलेला होता. 

अज्ञात व्यक्तींनी पिकाला काडी लावल्याने हातातोंडाशी आलेले ३० गुंठे मठाचे पीक, आवळ्याची झाडे व ठिबकचे पाइप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. माहिती मिळताच शेतकरी शिंदे शेतात झाले.
मात्र, उभे पीक व मशागतीची साधने जळून खाक झाल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल दिनेश आव्हाड करत आहेत. 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close