अहमदनगर ब्रेकिंग : शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुडे गावच्या शिवारात घडली आहे. 

नवीन एमआयडीसी परिसरात शेतामध्ये म्हशी सोडत असलेल्या तरुण विद्यार्थिनीस दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी धरून खाली पाडून एकाने तोंड दाबून दुसऱ्याने इच्छेविरुद्ध बळजबरी करुन जबरी संभोग करत बलात्कार केला व अत्याचार करुन दोघे आरोपी दुचाकीवरुन फरार झाले,

काल संध्याकाळी हा खळबळजनक प्रकार घडला . पिडीत तरुण विद्यार्थिनीने सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी रमेश आढाव, रा.अपधूप,ता. पारनेर, हल्ली रा.भोसरी पुणे, व राजू तरटे, रा. पळवे खुर्द , ता. पारनेर या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment