Connect with us

Ahmednagar News

अहमदनगर ब्रेकिंग : पूर्व वैमनस्यातून मजुरावर ॲसिड हल्ला !

Published

on

अकोले | पूर्व वैमनस्त्यातून टाकाहारी गावात ॲसिड टाकून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अमृता भिमा पथवे (मूळ, रा. चास, ता. सिन्नर) असे जखमीचे नाव आहे.

आरोपीने २६ जानेवारी रोजी अमृता पथवे यांच्या घरात न विचारता प्रवेश करत प्लास्टिक बादलीमध्ये आणलेेले ॲसिड पथवे यांच्या अंगावर टाकले. यामुळे पथवे यांना नाशिक सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

यामुळे पथवे यांच्या चेहरा, गुप्तभागावर मोठ्या प्रमाणावर इजा झाल्या आहेत. मात्र, हा हल्ला का केला, यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला करणारे तीन जण असून त्यातील एकास अटक करण्यात आली.

अटक केलेल्या व्यक्तीचे नाव बाबासाहेब रामनाथ एखंडे असे आहे. गुरुवारी रात्री अकोले पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Most Popular

error: Content is protected !!