Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

रोज लपून छपून विद्यालयात प्रणयाच्या लीला करणाऱ्या शिक्षक – शिक्षिकेचे बिंग फुटले !आणि …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- विद्यादानाच्या पवित्र कर्तव्याला फाटा देऊन रोज लपून छपून विद्यालयात प्रणयाच्या लीला करत राहणाऱ्या शिक्षक – शिक्षिकेने व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी बंद खोलीत दरवाजा बंद करुन आगळावेगळा व्हॅलेन्टाईन डे साजरा केल्याची घटना राहुरीतील एका विद्यालयात घडली .

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खिडकीच्या फटीतून पाहिलेला ‘ आँखो देखा हाल ‘ पाहन याचे बिंग बाहेर फोडले नी संतप्त पालकांनी शाळेला टाळेच ठोकले . पण या नाजुक प्रकरणावर शिक्षक शिक्षिकेची व मुख्याध्यापकाची बदली करुन पडदा टाकल्याचे समजते.

या शिक्षक प्रेमीयुगुलावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे . ही घटना व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच झाल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे घटनेची माहिती समजताच नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांनी शिष्टाई करून पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शाळेचे टाळे उघडण्यास सांगितले.

या शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या महिन्याभरापासून शिक्षक व शिक्षिकेमध्ये नको ते प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी दैनंदिन शाळेच्या दुपारच्या सुट्टीत होत असलेला हा ‘ आँखो देखा हाल ‘ काही पालकांना सांगितला.

त्यावर या घटनेबाबत शुक्रवार दि . १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११च्या दरम्यान संतप्त पालकांनी शाळेत येऊन टाळे ठोकले . या प्रकरणामुळे परिसरात सर्व नागरिक व महिलांनी गर्दी केली.

शाळेला टाळे ठोकल्याने सर्वच विद्यार्थी शाळेच्या बाहेरच ताटकळत उभे होते . ही घटना समजताच राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप चौधरी , सूर्यकांत भुजाडी , नंदकुमार तनपुरे , आदींनी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य समजावून घेत गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे , पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पाचारण केले.

उपस्थितांनी शाळेला टाळे ठोकणार्या पालकांची समजूत काढून शिक्षण अधिकारी पटारे यांनी या शिक्षक व शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. दरम्यान या संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.