Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

शिवभोजन थाळीबद्दल आनंदाची बातमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर केलेल्या पाचही केंद्रांत ७०० थाळीचे शिवभोजन सुरू आहे. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

या बाबतचा अहवाल प्रशासनाकडून सरकारकडे रवाना करण्यात आला आहे. सरकारचा ग्रीन सिग्नल मिळताच पुढील आठवड्यात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे वाढीव संख्येसह १४०० थाळीच्या शिवभोजनाची पंगत सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील गरीब गरजूंना दहा रुपये नाममात्र दरात शिवभोजन देण्याची घोषणा केली होती. एक जानेवारी रोजी योजनेचा रीतसर शासन निर्णय जारी झाला. त्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाने आघाडी घेत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शहरात ५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली.

जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या दिशानिर्देशात पुरवठा विभागामार्फत योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर व पुरवठा विभागातील कर्मचारी वर्गाचे पथक योजनेच्या काटोकोर अंमलबजावणीमध्ये व्यस्त आहे.

शिवभोजनाच्या पथदर्शी कामासाठी पुरवठा विभागाचे केंद्र चालकांना सूचना व मार्गदर्शन निरंतर सुरू आहे. गरजू लाभाथ्र्याला निश्चित करण्यात आलेले शिवभोजन मिळावे यासाठी केंद्रांची पुरवठा विभागाच्या तसेच अन्य आस्थापनांच्या वतीने नियमित तपासणी सुरु आहे.

उद्घाटना नंतर तिसऱ्या दिवसापासून जिल्ह्यासाठी पाचही केंद्रात मिळून मंजूर करण्यात आलेल्या सातशे थाळ्यांचा लाभ घेतला जात आहे. या योजनेचा लाभ घेणारे अनेक गरजवंत लाभार्थी शिवभोजनाबद्दल सरकारला मन:पूर्वक धन्यवाद देत आहेत.

मात्र अनेक गरजूंना माघारी जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन वाढीव सातशे थाळी संख्येचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व्दिवेदीच्या निर्देशात तयार करण्यात आला. सक्षमपणे सेवा देऊ शकतील अशा नव्या केंद्रांचा शोध घेण्यात आला.

त्यासाठी पुरवठा विभागाची मागील आठवड्यात मोहीम सुरु होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी व्दिवेदीच्या अध्यक्षतेखालील समितीने आणखी पाच केंद्रांना नव्याने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची ऐकून संख्या दहा झाली आहे.

वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पूर्वीच्या काही केंद्रांची थाळी संख्या देखील वाढविण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे रवाना करण्यात आला असून ग्रीन सिग्नल मिळताच शहरात चौदाशे थाळ्यांची शिवभोजन पंगत सुरु होणार आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.