संगमनेर मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह सासूला कुऱ्हाडीने मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- चारित्र्याचा संशय व मागील भांडणाच्या कारणातून नवऱ्याने पत्नीसह सासूला कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता तालुक्यातील दरेवाडी येथील केदार वस्तीवर घडली.

या दोघींना जबर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घारगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून व मागील भांडणाचे कारण काढून

भिका किसन भुतांबरे याने पत्नी कमलबाई भुतांबरे (रा. कुंभारवाडी, वरवंडी) व सासू सिंधुबाई धोंडिबा केदार (रा. केदारवस्ती, दरेवाडी) या दोघींना कुऱ्हाडीने मारहाण केली.

डोक्यात, खांद्यावर व तोंडावर कुऱ्हाडीचे वार झाल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघींना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमी सिंधुबाई केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिका भुतांबरे यांच्यावर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध पोलिस घेत होते. मात्र, तो मिळून आला नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment