World

संतापजनक : धार्मिकस्थळावर सेक्स करतानाचा व्हिडिओ शूट करून पॉर्न साइटवर टाकला, स्थानिकांत मोठी खळबळ !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारता शेजारील देश म्यानमारमधील पवित्र स्थळ बागान येथे 12 मिनिटांचा अश्लील व्हिडिओ बनविल्याचे समोर आले आहे, तेव्हापासून येथील नागरिक संतप्त झाले आहेत. इटलीमधील एका जोडप्याने अश्लीलतेचा कळस करत चक्क 12 मिनिटांचा पॉर्न व्हिडिओ तयार केल्यानं येथील स्थानिकांत मोठी खळबळ उडाली आहे.

9 व्या ते 13 व्या शतकाच्या दरम्यान बांधलेल्या या धार्मिक स्थळास युनेस्कोने वारसास्थळ म्हणून घोषित केलं आहे.. दरवर्षी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. गुरुवारी (13 फेब्रुवारी) या जोडप्याने हा अश्लील व्हिडिओ लोकप्रिय पॉर्न वेबसाइट पॉर्नहब डॉट कॉमवर अपलोड केला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, जोडप्याने गुरुवारी पॉर्न व्हिडिओ एका पॉर्न साइटवर टाकला. जेव्हा म्यानमारमधील स्थानिकांनी याची माहिती मिळाली तेव्हा लोकांनी राग व्यक्त केला. धार्मिक स्थळी असे कृत्य केल्यानं संतापाची भावना निर्माण झाली आहे.

‘इरवाडी’ स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे कि या धार्मिक ठिकाणी परदेशी लोकांना छोटे व अयोग्य कपडे घालण्यासही बंदी घातली आहे. विशेषत म्यानमारच्या धार्मिक इमारती आणि त्यांच्या आवारात उघड्यावर चुंबन घेण्यासारखे वर्तन करण्यास मनाई आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये  दोघेही एकमेकांचे कपडे काढत असल्याचं शूट केलं आहे. त्यानंतर सेक्स करत असतानाही शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओवरून एका फेसबुक युजरने संबंधितांना झापले असून बागानमधील पॅगोडा हे आमचं धार्मिक ठिकाण असल्याचं म्हटलं आहे.

सेवा बागान येथील सिव्हिल सोसायटी तील नागरिक मेयो सेट सॅन म्हणाले, “हा व्हिडिओ पाहून आम्हाला धक्का बसला आणि खूप वाईट वाटले. इथल्या धार्मिक वास्तूंमध्ये असले प्रकार कधीच सहन केले जाणार नाहीत. बागानमध्ये आमच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाचा एक अनमोल वारसा आहे. ”

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button