अकोल्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अकोले : आदिवासी अकोले तालुक्याच्या विकासासाठी संगमनेर जिल्हा करा, अशी मागणी संगमनेर जिल्हा व अकोले आदिवासी विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सतिष भांगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, निव्वळ आदिवासी भागात छोट्या मोठ्या धरणात २०.७६ टिएमसी पाणी साठले जाते. त्याबळावर अकोले तालुक्यातील ९१ हजार २५१ हेक्टर शेती ओलीताखाली येते. म्हणून अकोल्याच दर्जा उंचावला.

पण, याच तालुक्यात आदिवासी परिसराला नेहमीच ‘सावत्र’ म्हणून अगदी ‘नक्षली ऐरिया’सारखा ‘वंचित’ राहुन गेला आहे. संगमनेर जिल्हा झाला तर ३०० किलोमीटर अंतरावर असणारा अहमदनगर जिल्हा अवघ्या १५० किमीवर येऊन थोपेल.

प्रशासन जवळ येईल, निधी मोठ्या प्रमाणावर मिळेल, दळणवळण वाढेल, बाजारपेठ जवळ होईल, पर्यायी एमआयडीसीचे रस्ते खुले होतील. रस्ते, पर्यटन, शिक्षण आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

म्हणून, अकोल्याच्या दोन लाख आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी संगमनेर जिल्हा व आदिवासी विकास कृती समिती स्थापन केली आहे. अकोले तालुका नेहमी पुरोगामी आणि शिवसेनेच्या विचारधारेवर चालला आहे. येथे विशेष कोण्या बड्या नेत्याचे पाठबळ नसताना राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेने कायम काट्याची टक्कर दिली आहे.

विशेषत: आदिवासी समाजाने नेहमी शिवकाळापासून स्वराज्याचा विचार केला आहे. त्यामुळे, आज शिवसेनेच्या काळात आदिवासी समाजाचा विचार व्हावा, असे ही शेवटी निवेदनात सतिश भागरे यांनी म्हटले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment