Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingPolitics

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते.

हडपसर येथील मगरपट्टा सिटीमधील लक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमास सुनंदा व राजेंद्र पवार, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, चित्रपट निर्मात्या दीपशिखा देशमुख, अभिनेते मिलिंद गुणाजी आणि कवी अरविंद जगताप उपस्थित होते.

संस्थेचे चिन्ह, संकेतस्थळ, संस्थेचे सन्मान गीत, पुण्यातील कार्यालय आदी सर्व बाबींचे अनावरण व लोकार्पण या वेळी करण्यात आले. कर्जत व जामखेडच्या विकासाच्या दृष्टीने आयआयटी पवई आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, रोहित पवार यांनी कर्जत व जामखेडच्या विकासाच्या दृष्टीने मांडलेली दिशा आम्हा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. पर्यटनाचे हे मॉडेल या भागात विकासात्मक काम करेल. या उपक्रमाचा एक भाग असलेले ‘डोनेशन ड्राईव्ह’ हेदेखील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या संस्थेच्या माध्यमातून नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार व कंपनी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण व पर्यटनावर भर देऊन मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close