Maharashtra

तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. याचे पडसाद चौथ्या दिवशीही सुरू होते. भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदोरीकर महाराजांवरील वादात उडी घेतली.

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदोरीकरांना समर्थन दर्शवलं आहे. तर इंदोरीकर महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल आखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजपा आध्यात्मिक आघाडी व धार्मीक संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला.

महाराजांवर खोटा गुन्हा दाखल केल्यास आदोलन करण्याचा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे यांनी दिला आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायदा आणि महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची कीव करावीशी वाटते.

या सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन संपूर्ण राज्यभर त्यांचं कीर्तन ऐकलं जातं. ते जे बोलले आहेत, ते गुरुचरित्र, भगवद्गीतेमध्ये सप्रमाण सांगितलं आहे असं सुरेश धस म्हणाले.

उठसूट एकाच धर्माच्या मागे लागायचं. आधी शनि मंदिराच्या पाठी, आता इंदुरीकर महाराज, त्या अनुषंगाने जर कोणी काही बोललं, तर राज्य सरकार त्याला नोटीस पाठवणार असेल, तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते.

नोटीसनंतर पुढील कारवाई केली, तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. आम्ही शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी आहोत. असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button