Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्ता निवृत्ती शेलार या युवकावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेलार याने या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मोठ्याने आरडाओरड केला. तिच्या आईने तो एकून तिकडे धाव घेतली.

शेलार याने मुलीला पकडून ठेवल्याचे दिसले. आईला पाहताच मुलीने तिच्याकडे धाव घेतली. आरोपीने तेथून पळ काढला. पीडित मुलगी बराच वेळ रडत होती.

काही वेळानंतर आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने आरोपी शेलार याने केलेल्या कृत्याविषयी सांगितले. आई-वडील मुलीला घेऊन श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. आरोपी शेलार याला पोलिसांनी अटक केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.