Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingEducational

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली पाहिजे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

या मागण्यासंबंधी 1 मार्च पूर्वी सरकारकडून कार्यवाही न झाल्यास विधानसभेवर या विरोधात धडक मोर्चा नेण्याचा ठराव अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या कार्यकारणी बैठकीत झाला. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव तसेच युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी यावेळी उपस्थितांना सीएए आणि एनआरसी आणि भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणाचा समाचार घेतला.युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळा तील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून सरकारचे काम त्याच्यापर्यंत पोहोचवावे असे सांगितले.महिलांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये बरोबरीचे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघटनापातळीवर ठोस निर्णय घेतले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button