इंदुरीकर सातत्याने कीर्तनातून महिलांचा अपमान करत आहेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्य़ाप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी देसाई यांनी मंगळवारी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्याबरोबर काही महिला कार्यकर्त्याही होत्या.

कीर्तनातून प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी ४ फेब्रुवारीच्या कीर्तनात पीसीपीएनडीटी कायद्याचे उलंघन करणारे विधान केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कीर्तनातून वारंवार महिलांचा ते अपमान करीत आहेत.

अंधश्रद्धा पसरवित आहेत. त्यांच्या समर्थकांनी मारहाण करणे, चारित्र्यहनन, अश्लील शिवीगाळ करणे, मानहानी सुरू केली आहे. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी देसाई यांनी केली.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘इंदुरीकर सातत्याने कीर्तनातून महिलांचा अपमान करत आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत काम करीत आहेत. तरीही महाराज महिलांबाबत वेडीवाकडे वक्तव्य कीर्तनातून करत आहेत.

एक प्रकारे महिला वर्गांचा अपमानच ते करत आहेत. एका कीर्तनातून त्यांनी मुले व मुली कधी होतात हे सांगितले. त्याने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत आहे.

त्यामुळे इंदुरीकरांवर त्वरित गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल न झाल्यास महाराज यांच्या घरी जाऊन धडा शिकवू, महिला त्यांना काळे फसतील,’ इसा इशारा देसाई यांनी दिला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment