हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा पडल्याने केडगाव परिसरात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केडगाव उपनगरातील अंबिका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकला. त्यात हा व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून दोन मुलींची सुटका करण्यात आली.

सचिन शिवाजी कोतकर (रा. केडगाव) व सुनील मदन वानखेडे (रा. सारोळा, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.केडगाव उपनगरातील नगर – पुणे महामार्गावरील अंबिका हॉटेलमध्ये हा हायप्रोफाईल कुंटणखाना सुरू होता.

पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांच्या पथकाने सापळा लावून हॉटेलवर छापा टाकला. यापूर्वी देखील मिटके यांच्या पथकाने नगर – पुणे महामार्गावरील काही हॉटेलवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला होता.

केडगाव उपनगरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या अंबिका हॉटेलमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर छापा पडल्याने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

मिटके यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक अरुण परदेशी, हवालदार निपसे, पोलिस नाईक मिरपगार, भालसिंग, फसले, काळे, जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल भालेराव यांनी ही कारवाई केली. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment