लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भरधाव वेगातील लक्झरी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी निघोज फाट्याजवळील गव्हाणवाडी शिवारात घडली.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात ऋषिके सुदाम झरेकर गंभीररित्या जखमी होवून ते मृत पावले.

विशाल सिताराम कळमकर (वय २५, रा.कळमकरवाडी, ता.पारनेर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब घुमनकर सहाने (निअरगाव, जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

आरोपी सहाने हा लक्झरी बस (क्र.एमएच १९, वाय ३३७७) घेवून जात असताना त्याने फिर्यादीचा भाचा ऋषिकेश सुदाम दरेकर यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment