Breaking

धक्कादायक ‘या’ प्रयोगशाळेतून पसरला कोरोना?

बीजिंग : कोरोना व्हायरस सीफूडमुळे पसरला नसून चीनमधील जैविक प्रयोगशाळेतून पसरल्याचा दावा दावा काही अहवालातून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चीनमध्ये थैमान माजविणाऱ्या कोरोना विषाणूची भीती जगभर पसरत असताना या विषाणूचा प्रसार चीनच्या प्रयोगशाळेतून झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

वुहानच्या मासे बाजारातील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा प्राणघातक विषाणू सगळीकडे पसरल्याचा दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. त्यामुळे विषाणूच्या प्रसाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चीनमध्येकोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1770 वर पोहोचली आहे तसेच 70,548 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे.

हुबेई प्रांतातील राजधानी असलेल्या वुहान शहरात सर्वप्रथम डिसेंबरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. यानंतर झपाट्याने या विषाणूने शेकडो लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. चीनमधील साऊथ चायना तंत्रज्ञान विद्यापीठानुसार हुबेई प्रांतातील वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमध्ये या विषाणूचा जन्म झाला असावा.

या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसविणाऱ्या काही प्राण्यांना ठेवण्यात आलेले आहे. यात ६०५ वटवाघळांचा समावेश होता. त्यामुळे कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम संसर्ग याच प्रयोगशाळेतून झाला असण्याची शक्यता वैज्ञानिक बोताओ शाओ आणि ली शाओ यांनी व्यक्त केली आहे.

प्रयोगासाठी ठेवण्यात आलेल्या वटवाघळांपैकी एकाने एका संशोधकावर हल्लादेखील केला होता. त्यामुळे त्याचे रक्त संशोधकाच्या शरीरात गेले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. रुग्णांमध्ये आढळलेला जनुकीय क्रम ९६ किंवा ८९ टक्के होता.

टवाघळाच्या शरीरारील सीओसीझेडसी४५ कोरोना विषाणूशी हा मिळता जुळता आहे. परंतु हे विषाणू प्रामुख्याने राइनोफस एफिनिस या वटवाघळामध्ये आढळते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ही वटवाघळे वुहानच्या मासळी बाजारापासून ६०० मैल अंतरावर आढळतात.

त्यामुळे या भागातून विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत १,७७० जणांचा बळी गेला असून ७०,५४८ जणांना याची लागण झालेली आहे.

तो मांसामधून नव्हे तर चीनमधील जैविक प्रयोगशाळेतून पसरल्याचा दावा काही अहवालांमधून करण्यात आला आहे. त्यामुळे चीनमधील जैविक प्रयोगशाळा वादात सापडली आहे. मात्र, याबाबतचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. चिनी प्रशासनाने याबाबत मौनच बाळगले असल्याने संशय वाढत चालला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button