तहसीलसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले : तालुक्यातील जांभळे गावात जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद सुरू आहे. या वादातून तबाजी खरात या व्यक्तीने अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली.

अकोले पोलीस ठाणे व संबंधित विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी (दि.१८) बारा वाजण्याच्या सुमारास अकोले तहसील कार्यालयाच्या (गेट) आवारात तबाजी खरात (रा. जांभळे) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु, विष प्राशन केलेल्या तबाजी खरात याला अकोले पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment