मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे प्रारंभ पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके व मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विद्यापिठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हामजा चुडीवाला, नईम सरदार, जुनेद शेख, अकलाख शेख, संतोष गोयल, राजू साखला, योगेश बेंद्रे, नवीद शेख, फैय्याज शेख, समीर शेख, इकराम तांबटकर, रमीज शेख, शाकिर शेख, सरफराज चुडीवाला, अबरार पठाण, रफिक रंगरेज आदिंसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून, यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी व्यक्त केली. मन्सूर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.

त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम व्यक्तींकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, सत्ताधार्‍यांनी देखील शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन त्यांच्या विचार अंगीकारण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment