आणि ते चौघे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- तालुक्यातील कडित बुद्रुक येथील शेतकरी तुळशीराम वडितके हे पत्नी व मुलासह ऊस तोडणी सुरु असलेल्या आपल्या शेतात काल पहाटे 5.30 वाजता मोटरसायकलवरुन जात असताना कोल्हार-बेलापूर रस्त्यावर कडित खुर्द व कडित बुद्रुक शिवरस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग सुरु केला.

मात्र गाडी वेगात असल्याने वडितके कुटुंबिय बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले तर त्याच ठिकाणी संकेत मेनगर या 19 वर्षाचा तरुणावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात गळनिंब येथील 3 वर्षाची मुलगी ज्ञानेश्वरी मारकड हिच्यावर बिबट्याने हल्ला करुन तिचा बळी घेतला.

त्याचपूर्वी सप्टेंबरमध्ये कुरणपूर येथील दर्शन देठे या बालकाचा बिबट्याचा हल्ल्यात मूत्यू झाला. तशी काही घटना काल दि.21 रोजी महाशिवरात्रीच्या भल्या सकाळी होता होता टळली. कडित येथील शेतकरी तुळशीराम वडितके, पत्नी शुभांगी व मुलगा ऋषिकेश समवेत सकाळी 5.30 वाजता मोटरसायकलवरुन शेतात चालले होते.

याचवेळी कडित शिवरस्त्यावर जानकु वडितके यांच्या उसाच्या शेतात नबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकल वेगात असल्याने हे तिघेही बालंबाल बचावले. तर येथील संकेत मेनगर हा 19 वर्षाचा तरुण याच रस्त्यावरुन सायकलवरुन सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जात असताना बिबट्याने या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सायकलच्या मागे काही तरी गुरगुरण्या सारखा आवाज आल्याने संकेत याने मागे पाहिले. त्याला बिट्या आपल्याकडे येत असल्याचे दिसले. त्याने बिबट्याच्या दिशेने सायकल ढकलून पळ काढला व आरडाओरडा केला. आवाज ऐकून तुळशीराम वडितके व प्रवरा सहकारी साखर कारखाना ऊसतोड मजुरांनी संकेतच्या दिशेने धाव घेतली. जमाव पाहुन बिबट्या पुन्हा उसाच्या शेतात पळुन गेला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment