कोरोनाच्या धास्ती मुळे झाली तब्बल ६००० सर्जिकल मास्कची चोरी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जपानमधील रेडक्रॉस हॉस्पिटलमधून सुमारे ६००० सर्जिकल मास्कची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोना नावाच्या आजाराच्या धास्तीमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मास्कची जबरदस्त टंचाई निर्माण झाली आहे .

या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक लोकं मास्क खरेदी करत आहेत,  मास्कच्या किमतीसुद्धा भरमसाट वाढल्या आहेत.

कोबे शहरातील रेडक्रॉस हॉस्पिटलच्या स्टोअररूममधून मास्कचे मोठे ४ बॉक्स चोरीस गेल्याचे सकाळीच ऑपरेशन थिएटरच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले .

हे मास्क बाजारात महाग दराने विकत असावेत अशी शंका व्यक्त होत आहे .

जपानमध्ये ६५ फेस मास्कच्या एका पॅकेटची किंमत ५०, 000 येन ( सरासरी ४५६ डॉलर ) आहे.

 

Leave a Comment