अहमदनगर ब्रेकिंग : गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातात राहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा मृतु झाला.

नंदकिशोर संपत निर्मळ (वय २८) गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय ६३, दोघेही रा.पिंपरी निर्मळ ता.राहाता), प्रवीण सारंगधर शिरसाठ (रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत.

अपघातात मृत्यू पावलेले हे सर्व जण शनिवारी (दि.२२) दुपारी पिंपरी निर्मळ येथून इर्टीका मोटारीने (एम.एच.१७, ए झेड.-४५७) गुजरात येथील कुबेर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते.

दर्शन आटोपून रविवारी (दि.२३) दुपारी ते परतीच्या प्रवासात असताना नर्मदा शहरानजीक रस्त्यावर कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यातच या चौघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment