Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingSpacial

कोरोनामुळे चिकन झाले इतके स्वस्त …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोरोनामुळेे कुक्कुटपालनाला लागलेले अफवांचे ग्रहण अधिकच गडद झाले आहे. मांसाहाराने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्यानंतर चिकनचे कोसळणारे दर सावरलेले नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

करोनाचा प्रभावामुळे राज्यात चिकनची मागणी घटली. नगर जिल्ह्यातील चिकन विक्रीचा दर 50 रुपयांनी कमी झाला आहे. करोनाच्या अफेवेमुळे राज्यात कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने याचे 150 कोटींचे नुकसान झाले.

सोशल मीडियावर कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषगांने कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय माहिती पसरविली गेली. यामुळे राज्यात चिकनचा तीन ते साडेतीन हजार कोटी टन असलेला खप कमी होऊन तो दोन हजार टनांवर आला.

राज्यात जवळपास दररोज 10 ते 11 कोटींचा फटका बसत असल्याचे पशूसंवर्धन विभागाने यापूर्वीच जाहीर केले. या संदर्भात पशूसंवर्धन विभागाकडे माहितीबाबत विचारणा केली असता, जिल्ह्यात कुक्कटपालनाची कोणतीच माहिती नसल्याचे समोर आले.

2012 ला झालेल्या जिल्ह्यातील पशूगणनेत जिल्ह्यातील कुक्कटपालन करणार्‍या फार्मची माहिती घेण्यात आलेली नाही. यासह 40 दिवसात बॉयलर कोंडीची स्थलांतर होत असल्याने एकदा घेतली माहितीत बदल होत असल्याचे पशूसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात शेतकर्‍यांकडे 79 लाख कोंबड्या (पक्षी) आहे. तर जिल्ह्यात अंदाजे 20 ते 25 लाख बॉयलर कोंबड्या असून त्यांची विक्री ही मुंबईला करार पध्दतीसोबत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणार्‍या रिटेलर मासंविक्रेत्यांमार्फत होत आहे.

जिल्ह्यात दररोज 10 ते 12 टन बॉयलर कोंबड्याच्या मांसाची विक्री होते. कोरोनच्या अफवेमुळे मुंबई मार्केट आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विक्रीवर मोठा परिणाम झाला.

आधी 100 ते 110 रुपये प्रती किलो दराने विक्री होणारे बॉयलरचे दर आता 50 ते 60 रुपये किलोपर्यंत खाली आल्याचा दावा पशूसंवर्धन विभागातील सुत्रांनी केला आहे. तर हा दर सध्या 30 ते 35 रुपये प्रती किलो असल्याचे कुक्कटपालन व्यवसाय करणार्‍या शेतकरी-व्यापार्‍यांकडून सांगीतले जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close