रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांची छेड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांनाची छेड काढणार्‍या टोळक्यावरून भिंगारमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे सुमारे दोनशे ते अडीशे लोकांचा जमाव भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी महिलांना त्रास देणार्‍या हयाब्रेड उर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नु ऊर्फ तन्वीर, सलमान शेख, जुबेर खान, अजर खान, भुर्या (पूर्ण नाव माहीत नाही), शौकत सुलेमान सय्यद उर्फ बब्बू,

निसार शेख, तन्नुचा भाऊ, अन्वर शेख, सोनू शेख, शहारुख पठाण रिक्षावाले, टायगर (पूर्ण नाव माहित नाही) अशा 16 जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी, शनिवारी रात्री भिंगारमधील वडारवाडी भागात काही महिला शौचालयासाठी जात असताना रस्त्यावर उभा असलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

यावर महिलांनी आरडाओरडा केला. ओरडण्याचा आवाज येताच तेथे निलेश कोरडे व आकाश पवार हे दोघे आले. त्यांनी या टोळक्यांना जाब विचारला असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली.

एका महिलेच्या फिर्यादीवरून त्रास देणार्‍या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर त्रास देणारे टोळके पसार झाले. भिंगार पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment