डॉ सुजय विखे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची मुंबई येथे मंत्रालयात जाऊन भेट घेतली. नगरमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधेसाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या विकासासंबंधित व इतर कामांविषयी चर्चा केली केली असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नागपूर व नगर असे दोन उपकेंद्र असून, 2006 पासून ही उपकेंद्र सुरु करण्यात आली आहे. नगमधील मौजे बाबुर्डी, घुमट ता. नगर येथील सुमारे 32 हेक्टर 93 आर गायरान जमिनीचे क्षेत्र विद्यापीठाला हस्तांतरित करण्यात आले. 2014 साली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या उपकेंद्राला मान्यता देण्याचा निर्णय घेऊन, येथील 90 शिक्षक तसेच 179 शिक्षकेतर कर्मचारी पदे तसेच इतर भांडवल व महसूल मुद्द्यांचा समावेश त्यामध्ये होता.

या सर्व प्रलंबित विषयांमुळे नगरमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मिळणारी चालना कमी झाली असून योग्य पद्धतीने या उपकेंद्राच्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची मागणी माननीय मंत्रिमहोदयांना केली असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment