अहमदनगरमध्ये गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरमध्ये सर्रासपणे विक्री होणारी गुटखा विक्री अखेर तात्पुरती बंद झाली आहे. गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

या बैठकीत श्रीगोंदे मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी नगरमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. या वेळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

त्यानंतर नगर शहर व परिसरात छुप्या पध्दतीने सुरू असलेली गुटखा विक्री बंद करण्यात आली. राज्यात यापूर्वीच गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरी देखील गुटख्याची अवैधरित्या विक्री सुरू होती. प्रशासनाने नगर शहरासह व उपनगरमध्ये गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment