अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डॉक्टरच्या शेतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरात भरदिवसा डॉक्टरच्या शेतात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाचकर,वय २४ याने एका डॉक्टरच्या शेतात जावून तेथे असलेल्या अल्पवयीन १७ वर्ष वयाच्या गरीब तरुणीला तू माझ्यासोबत चल, शेतात काम आहे असे म्हणाला तेव्हा ओळखत असल्याने तरुणी विश्वासाने आरोपी ज्ञानेश्वर बाचकर बरोबर गेली.

त्याने डॉक्टरच्या शेतातील शेडमध्ये अल्पवयीन तरुणीला नेले व तेथे बसविले . ती म्हणाली , काय काम आहे तेव्हा आरोपीने तिला धरुन तिचे कपडे काढून , तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला व हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही , तुझा खून करील , अशी धमकी दिली .

पिडीत तरुणी गरीब असल्याने घाबरली . मात्र तिचे पोट दुखू लागल्याने डॉक्टरांकडे नेण्यात आले . तेव्हा ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व तिने घडलेला प्रकार नातेवाईक व पोलिसांना सांगितला. त्यावरुन आरोपी ज्ञानेश्वर भाऊसाहेब बाचकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

डिवायएसपी वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली . डिवायएसपी वाघचौरे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान ज्या डॉक्टरच्या शेडमध्ये अल्पवयीन गरीब मुलीवर अत्याचार झाला त्यांचीही चौकशी करणार असल्याचे डिवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment