विविध मागण्यासांसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची निदर्शने अन्यथा लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, रतन तुपविहिरे, सुनील सोयगावकर, पी.बी. गायकवाड, सचिन पैठणकर, संदीप महारनवर, बाळासाहेब गाडे, किशोर शिरसाठ, राजहंस देसाई, वासुदेव राक्षे, प्रकाशराव साळवे, अनिल जाधव, प्रभाकर दराडे, प्रभाकर उबाळे, एकनाथ रणदिवे, संजय भिंगारदिवे, विनोद पंडित, आशिष अल्लाट, निलेश उबाळे, किरण शिरसाठ, योगेश नन्नवरे, रामभाऊ वाळुंज आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

सदरील मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय निमशासकीय कार्यालयातील सध्या रिक्त असलेली सर्व पदे त्वरित भरावी, प्रत्येक कार्यालयात मागासवर्गीय कर्मचारी तक्रार निवारण समिती स्थापन करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळावे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पडताळणी पथक स्थापन करण्यात यावे, 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना 1 जुलै रोजीची वेतन वाढ मानीव वेतनवाढ म्हणून देण्यात यावी, कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय कक्षामध्ये मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात यावा, मागासवर्गीय कर्मचार्‍यांची रोखलेली पदोन्नती तात्काळ सुरू करावी, तर 28 महिन्याची महागाई भत्ता थकीत रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार आर.जे. दिवाण यांना देण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment