Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन बालकांना चावा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील चितळी येथे शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्र्याने चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. काल गुरुवारी (दि. २७) खेळणाऱ्या मुलांमध्ये अचानक येऊन तिघांना या कुत्र्याने चावा घेतला.

याता शिवराज गणेश चौधरी (वय ५), संकेत संदीप भोसले (वय १४) व तिसऱ्याचे नाव समजू शकले नाही. या चिमुरड्यांना चावा घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या आणखी दोन लहान मुलांना या कुत्र्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो फसला. केवळ या मुलांचा शर्ट फाटला. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील तरूणांनी पिसाळलेल्या कुत्र्यास पाठलाग करून ठार मारले. तत्पूर्वी या कुत्र्याने काही मोकाट फिरणाऱ्या कुर्त्यांनाही चावा घेतला असल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक स्वरूपात या बालकांना खैरी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु, मुले लहान असल्याने त्यांना पहिला ए.आर.एस. हा डोस येथे नाही. तो घेण्यासाठी नगर जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचे पालक अतुल चौधरी यांनी यावेळी सांगितले. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close