BreakingMaharashtra

बुधवार पेठेत जुना वाडा कोसळला; २ जखमी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुणे शहरातील बुधवार पेठेतील सिंगालिया वाड्याचा भाग रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघींना वाचविण्यात यश मिळवले. वाडा बराच कोसळल्याने उर्वरीत भाग धोकादायक बनल्याने सगळा वाडाच नंतर जमिनदोस्त करण्यात आला.

या घटनेत गंगूबी कल्याणी आणि विनायक कल्याणी हे किरकोळ जखमी झाल्या. हा वाडा सुमारे ८० ते ९० वर्षे जुना होता.

अग्निशमनदलाचे प्रदीप खेडेकर म्हणाले,‘रविवारी सकाळी सव्वासातला आम्हाला फोन आला. त्वरित कसबा पेठेतील गाडी दगडूशेट हलवाई मंदिराजवळच्या घटनास्थळी पाठवण्यात आली.

वाडा बराच कोसळला होता. मातीचे ढिगारे, धूळ, लाकडे, तुळया, विटा आणि अरुंद जागा यामुळे मदतकार्यात अडथळे होते. मात्र, काही वेळानंतर आजी आणि एक महिला यांना बाहेर काढण्यात यश मिळाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button