आरोग्य सुविधांवर खर्च होऊनही कुपोषणाने मुले दगावतात कशी? – डॉ.अभय बंग यांची खंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / लोणी :- देशात आर्थिक सुबत्ता आहे. विकसित तंत्रज्ञान आहे, भौतिक सुविधा आहेत, आरोग्य सुविधांवर हजारो करोडो रुपये खर्च होतात तरीही दरवर्षी बारा लाख मुले कुपोषणाने दगावतात कशी? अशी खंत सर्च संस्थेचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.

प्रवरा ग्रामीण वैद्यकीय अभिमत विद्यापीठाच्या 14व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी) ही पदवी व मानपत्र देऊन विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय केळकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय.एम. जयराज उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बंग यांनी आज पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी खर्‍या अर्थाने आरोग्य सैनिक आहेत. तुमच्या हातात असलेल्या प्रमाणपत्रावर एक बाजू पदवीची छापली आहे पण दुसरी बाजू कोरी आहे. तो तुमच्या आयुष्याचा सकारात्मक ‘ब्लॅंक चेक’ झाला पाहिजे.

पैसे खूप काही आहेत पण पैसे म्हणजे पूर्ण आयुष्य नाही. तुमच्या आयुष्याचा अर्थ शोधा. पायाभूत सुविधांनी आयुष्य सुंदर होतचं अस नाही. आयुष्य सुंदर करण्यासाठी जिथे सुविधा नाहीत तेथे काम करा, तेथे तुमची जास्त गरज आहे.

जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय जग तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही असे सांगत विद्यार्थ्यानी राज्याच्या दुर्गम भागात कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांनी डॉ. अभय बंग यांनी सर्च संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी केलेले कार्य हे ‘पायोनियर’ असून त्यांच्या याच कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यानी घेतली पाहिजे व ज्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा नाहीत तेथे त्या पोहोचविण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा विद्यार्थ्यांकडून त्यांनी व्यक्त केली.

या पदवीप्रदान समारंभात 363 पदवी, 120 पदव्युत्तर व 9 पीएचडी अशा 492 विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या कार्याचा व विकासाचा आढावा कुलगुरू डॉ.जयराज यांनी प्रास्ताविकात घेतला.

तर आभार कुलसचिव डॉ. संपत वाळूंज यांनी मांडले. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.ताकवले, डॉ.कवडे, एम.एम पूलाटे, मोनिका सावंत-ईनामदार, परीक्षा नियंत्रक डॉ.बाळासाहेब नाईक आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment