इंदोरीकर महाराजांच्या या कीर्तनाने मोडले सारे रेकोर्ड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव : कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी ‘आजचा युवक दिशा आणि दशा’ या विषयावर इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते.

या कीर्तनाने डॉ. आंबेडकर मैदानावरील गर्दीचा उच्चांक मोडला. दोन तास चाललेल्या कीर्तनात अखेरपर्यंत रस्त्याच्या चारही बाजूंनी नागरिकांचे लोंढेच्या लोंढे मैदानाकडे येत होते. हजारो भाविकांच्या समोर इंदोरीकर महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर लहान वयात जिजाऊंनी संस्कार केले, म्हणून ते घडले.

तसे तरुणांनी एकत्र येऊन जीवन उत्कर्षाचे तत्व पाळावे. व्यवसायाकडे वळावे. प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, त्यात यश आहे आणि तीच शिवजयंती साजरी करण्याचा आनंद आहे.

तोंडावर गोड बोलणारी माणसं आपला घात करत असतात. जोपर्यंत गरिबी आहे, तोपर्यंत आपल्याला शत्रू नाही, असेही ते म्हणाले. प्रारंभी विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षात केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्­वारूढ पुतळ्यास इंदोरीकर महाराजांनी पुष्पहार अर्पण करत थेट भाविकांमधून चालत येत व्यासपीठ गाठलं. १७ वर्षे भारतीय लष्करी सेवेतून संवत्सरचे नितीन कुहिले सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment