Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नगरसेवकाची गुंडागिरी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले ! आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेच्या एका नगरसेवकासह पाच ते सहा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची व शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याची फिर्याद नालेगावच्या झारेकर गल्लीतील महिलेने दिली आहे. 

फ्लॅट खरेदीसाठी पैसे देवूनही खरेदीची कार्यवाही न केल्याने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग येवून शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यासह 5 ते 6 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याची व शिवीगाळ केल्याची फिर्याद महिलेने दिली असून या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे, सुरज सिंदुपटला, सुरज शिंदे, गणेश चव्हाण, समीर शेख व इतर दोन-तीन अनोळखी इसम (सर्व रा.झारेकर गल्ली, नालेगाव) यांचा समावेश आहे.

फिर्यादी महिलेच्या कुटुंबीयांनी नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या मालकीच्या पाईपलाईन रोड वरील फ्लॅटच्या खरेदीसाठी त्यांना 12 लाख रुपये दिले होते. पैसे घेवून लोंढे यांनी फ्लॅटची खरेदी करून दिली नाही. त्यामुळे त्यांना पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

तसेच रविवारी (दि.1) रात्री 8.30 च्या सुमारास आणि सोमवारी (दि.2) रात्री 2.30 च्या सुमारास सात ते आठ जणांच्या जमावाने घरी येवून शिवीगाळ करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे.

यातील महेश चव्हाण व समीर शेख यांनी घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच विनयभंग केल्याचेही या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close