अपहाराचा ठपका असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव नगरपालिकेतील मार्केट विभागाचे निलंबित लिपिक सोपान निवृत्ती शिंदे (५३ वर्षे) यांनी मंगळवारी कर्मवीरनगर येथील काटवनात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. वसुली विभागात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर होता.

शिंदे हे अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या मार्केट व वसुली विभागात काम करत होते. हजरजबाबी स्वभावाचे शिंदे प्रशासकीय कामात कुशल असल्याने राजकीय नेत्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटे.

वसुली विभागात त्यांचा दबदबा होता. शहरातील नागरिक त्यांच्याकडून कामे करून घेत. घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यापासून व्यावसायिक गाळे खरेदीचे व्यवहार शिंदे यांच्यामार्फत केले जात, अशी चर्चा होती.

शिंदे यांनी पालिकेचे पैसे वैयक्तिक कारणासाठी वापरले, नागरिकांनी पालिकेत भरण्यासाठी दिलेले पैसे परस्पर खर्च केले, असा ठपका ठेवत पालिकेने त्यांना नुकतेच निलंबित केले होते.

या प्रकरणाची चौकशी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे करत होते. नागरिकांनीही शिंदे यांच्याविरुद्ध तक्रारी देण्यास सुरुवात केली होती. लाखोंच्या देणेदारीमुळे शिंदे अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment