BreakingCrimeMaharashtra

धक्कादायक : प्रेयसीने केली प्रियकराची हत्या कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- प्रियकर लग्न करत नसल्याच्या कारणावरुन थरारक हत्याकांड पुण्याजवळच्या नऱ्हे गावात घडलं. प्रेयसीने कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केला.प्रियकराची हत्या करुन आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली.  

महंतेश बिरादार (27 वर्षे) मूळ रा. संख, ता.जत, जि.सांगली असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुराधा करे ( वय 24 वर्षे) सध्या रा. नऱ्हे, मूळ गाव करेवाडी, ता.जात जि.सांगली असे खून करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती.

त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला.  रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला. 

महंतेश झोपलेला असताना पहाटे साडेचारच्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.

त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वत: पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी अनुराधाने सिंहगड पोलिस ठाण्यात महंतेश विरुध्द बलात्काराचा गुन्हाही नोंदविला होता. परंतु, नंतर त्यांच्यात तडजोडही झाली होती, दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता, असेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close