श्रीगोंद्यात ओळखीचा फायदा घेऊन महिलेवर लॉजमध्ये नेऊन बलात्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका महिलेची पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील पुरुषाशी ओळख झाली. त्यातूनच त्याने २२ फेब्रुवारीला नगर-दौंड रस्त्यावरील चिखली घाटाजवळील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात मंगळवारी अट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेषराव काशिनाथ बडे (हल्ली राहणार नागापूर एमआयडीसी, नगर) असे आरोपीचे नाव आहे.

ओळखीचा फायदा घेऊन त्याने महिलेस दुचाकीवर नगर-दौंड रस्त्यावरील चिखली घाटाच्या अलीकडे असलेल्या लॉजमध्ये नेले. त्याने बळजबरी करताच महिलेने आरडाओरड केला. तू जर कुणाला सांगितले, तर मारून टाकीन, असे म्हणून त्याने जातिवाचक शिवीगाळ केली. बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment