Ahmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेरमध्ये गोळीबार ! भांडण पहाणारा तरुण जखमी …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा  गोळीबार झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकाराने पारनेर तालुका हादरला आहे.

गेल्या महिन्यातच तालुक्यातील वडझिरे येथे गोळीबारात एक महिलेचा जीव गेला तर आज सकाळीच गुणवरेनजिक शिनगरवाडी रस्त्यावर गोळीबार झाला.

भांडणे करणाराऐवजी भांडण पहाणारा संजय पवार रा. राळेगण थेरपाळ (वय23 ) हा तरुण जखमी झाला आहे.

आज सकाळी  शिणगरवाडी रस्त्याच्या कडेला एका ओढ्याजवळ चौघांची भांडणे सुरू होती.

त्याच वेळी राळेगण थेरपाळ येथील संजय पवार हे आपल्या मेव्हण्यास भेटण्यासाठी टाकळी हाजीकडे दुचाकीवरून भेटण्यास निघाले होते.

गावठी कट्ट्यातून झाडली गोळी त्यांना चौघात भांडण सुरू असल्याचे दिसले.

ओढ्याजवळ तो आला असता सहज कोणाची भांडणे चालली आहेत हे पहाण्यासाठी तो आपली दुचाकी सावकाश चालवत होता.

त्याच वेळी चौघांची भांडणे हातघाईला आले होते. त्या मुळे त्यातील एकाने त्याच वेळी आपल्या जवळील गावठी कट्यातून एक गोळी झाडली.

मात्र, ही गोळी नेमकी भांडणे सुरू असेल्या चौघांपैकी कोणालाच न लागता दुचाकीवरील वाटसरू पवार यांच्या हाताला लागली, त्यात ते जखमी झाले.

गोळी लागताच ते पळाले पवार यांना गोळी लागताच त्या चौघांनी तेथून पळ काढला. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button