अहमदनगर ब्रेकिंग : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पती-पत्नीने स्वत:ला विविस्त्र करून मारहाण केला जात असल्याचा व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्रांच्या संगनमतीने हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती सदर महिलेच्या पतीने दिली.

त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता या महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी बनाव केले असल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी एक मारहाणीची विवस्त केलेली एक व्हिडीओ क्लिप वायरल झाली होती . या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

सोशल मिडीयावर या घटनेचा ठा निषेध झाला. माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारवर टीकचे ताशेरे ओढले हाते. या घटनेत नगर पोलिसासमार सत्य उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते आव्हानानतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तोफखाना पालिसाना या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

तक्रारीमध्ये घटना दाखविण्यात आला होती व यामध्ये आठ ते दहा लोकांचा जमाव दाखविण्यात आला होता . फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून यामध्ये दोन व्यक्ती पोलिस असल्याचे सांगण्यात आले होते . त्यामुळे एकूणच पोलिसांवर ही सगळी घटना उघडकीस आणण्याचे खरा व योग्य तपास करण्याचे आव्हान होते.

पोलिसांनी तपासामध्ये घटना नेमकी कुठे घडली , ते घटना स्थळ तसेच क्लिपमधील एकूण लोक याचा तपास सुरू केला . हा सर्व तपास करीत असताना एका संशयित आरोपीला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता त्याने दिलेल्या माहितीवरून , फिर्याद दिलेल्या फिर्यादीने या घटनेचा बनाव केला असल्याचे सांगितले.

पीडित महिलेच्या पतीने पाथर्डीतून तीन मित्रांना बोलवून घेतले होते. त्यानंतर त्याना एका हॉटेलमध्ये दारुची पार्टी दिली आणि पत्नी व त्यांना विवस्त्र करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ तयार करण्याचा प्लॅन सांगितला.

ते तिघेही तयार झाले होते. त्यानंतर स्टेशन रोड येथील एका शाळेतील खोलीमध्ये रात्रीच्या दरम्यान व्हिडिओ तयार करण्याचे ठरले. त्यानुसार निर्मुष्य ठिकाणच्या एका खोलीत जावून हा व्हिडिओ बनविण्यात आला, असं पीडित महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितलं. 

विवस्त्र करून मारहाण केल्याची फिर्याद देणार्‍या पीडित महिलेने मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्व बनाव उघडकीस आल्यानंतर बदनामीच्या भीतीने तिने हे कृत्य केले असावे, असे सांगितले जात आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय पद्धतशीरपणे तपास करून आरोपींना अटक केली. तसेच कशा पद्धतीने कट रचून बनाव केला, याचे पुरावेही तयार केले आहेत. सर्व पुरावे जुळविल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेची कार्यवाही केली आहे. दरम्यान, पेट्रोल ओतून मारहाण करण्यात आल्याच्या ठिकाणी जावून पोलिसांनी पंचनामा केला आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment