Ahmednagar NewsBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन केली आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कर्जत तालुक्यातील राशीन नजीकच्या गायकवाड वस्तीवरील आण्णा शिवराम गायकवाड (वय ३८) या तरूण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मयत आण्णा गायकवाड हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेथे त्यांनी बाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे शेजारी त्यांचे बंधु नाना गायकवाड यांच्या लक्षात आले.

त्यांनी वस्तीवर राहणाऱ्या आसपासच्या लोकांना बोलावले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.गायकवाड यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे व मुलगी आहे.

अहमदनगर मधील हे १५ पर्यटन स्थळे तुम्हाला माहित आहेत का ?

२६ वर्षे जनतेला हसवले पण आज मला रडावं लागतंय ….

सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग ?

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close