Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtraPoliticsSpacial

आमदार रोहित पवारांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गेली अनेक वर्षे कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे वर्चस्व होते.आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून त्याला ब्रेक लागला आहे.कोमात गेलेल्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत.कर्जतमधून मोठे नेतृत्व तयार होऊ न शकल्याने अखेर पवारांनाच येथे विशेष लक्ष घालावे लागले.

पवारांनी लक्ष घातल्यानंतर निकाल काय येतो याचा प्रत्ययही अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. कर्जत-जामखेड राज्याच्या राजकीय पटलावर गाजले.इथून पुढेही याची चर्चा होतच राहणार यात शंका नाही. कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादीसाठी अतिशय मरगळ आलेला मतदारसंघ होता.

अनेकदा प्रयत्न करूनही हा मतदारसंघ ताब्यात न आल्याने याकडे पक्षातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत राहिले.मुळातच येथून तयार झालेल्या नेतृत्वाला मोठी उंची गाठता आली नाही.

वैचारिक बैठक व व्यापक विचारांचा अभाव,राजकारणाला व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची पद्धती अशा कारणांमुळे अनेक पुढाऱ्यांचे पुढारपण जिल्हा परिषदेपुरतेच सीमित राहिले.राजकारणात फक्त महत्त्वाकांक्षा असून चालत नाही तर सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याची मनोवृत्ती असावी लागते याचा अनेकांना विसर पडला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभारी घेणारे नेतृत्व कर्जतमध्ये तयार न झाल्याने पक्षालाही मर्यादा आल्या.अखेर रोहित पवार यांनी मोठे आव्हान स्वीकारून यश संपादन केले. आता कणखर नेतृत्व लाभल्याने मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांना मोठी उभारी आली आहे.

आमदार रोहित पवार यांचा जनतेशी थेट संपर्क सुरु आहे.अडीअडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धती कोषातून बाहेर न पडलेल्या कर्जत तालुक्यातील अनेक नेत्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

त्यामुळे आता त्यांच्याकडूनही जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा काहीसा प्रयत्न केला जात आहे. एवढे दिवस मोठी पदे घेऊन फक्त मिरवणाऱ्या अनेक नेत्यांची आता ओढाताण होत आहे. पवारांच्या नजरेत भरण्यासारखी कामे केली तरच त्यांचा आता टिकाव लागणार आहे.

पदे टिकवण्यासाठी त्यांना आता पवार यांच्या कसोटीला उतरावे लागणार आहे.त्यामुळे आता अनेकांची कार्यपद्धती बदलून ती लवचिक होताना दिसत आहे.कधी नव्हे एवढा जनतेशी संवाद सुरू झाला आहे.

त्यामुळे कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीला हळूहळू उभारी येत आहे.पंचायत समितीची सत्ता काबीज केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक सक्रिय होताना दिसत आहे.

मोठे संघटन असतानाही सत्तेच्या अभावामुळे त्यांना कर्तृत्व सिद्ध करता आले नव्हते.आता सर्व परिस्थिती अनुकूल असल्याने कर्जतमधील राष्ट्रवादी मोठ्या जोमाने वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

दारुड्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी

अहमदनगर मधील हे १५ पर्यटन स्थळे तुम्हाला माहित आहेत का ?

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button