Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, दुचाकीचा जागीच चक्काचूर

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुरुवारी (दि. ५) सकाळी सव्वासात वाजेच्या पूर्वी ही घटना घडली.

शिवराम साहेबराव ढाकणे (वय ३७, रा. डुंबरवाडी, खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवराम ढाकणे हे दुचाकी (क्र. एमएच १४ डीबी ५४८१) वरून गुरुवारी (दि.५) सकाळी सव्वासात वाजेच्या पूर्वी पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून घारगावकडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना बोटा याठिकाणी असलेल्या उड्डाण पुलावर आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात ढाकणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी अपघाताची माहिती घारगाव पोलिसांना दिली. लागलीच महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात ठार झालेल्या ढाकणे यांचा मृतदेह खासगी रूग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात आणण्यात आला होता. याबाबत घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास मुख्य हवालदार कैलास देशमुख हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button