बाह्यवळण रस्‍त्‍याच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहाता :- दळणवळणाच्या दृष्‍टीने महत्वपूर्ण असलेल्या नगर मनमाड या मार्गावरील कोल्हार ते बाभळेश्वर तसेच बाह्यवळण रस्‍त्‍याच्या कामासाठी २३४ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. कोल्हार येथे प्रवरा नदीवरील नवीन पूल, बाभळेश्वर येथील उड्डाण पूल आणि बाह्यवळण रस्‍त्‍याच्या मजबूतीकरणाचे कामही आता या निधीतून मार्गी लागणार असल्याची माहिती माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नगर मनमाड हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जातो. शिर्डी आणि शनिशिंगणापूर या दोन तिर्थस्थानांकडे येणाऱ्या भविकांच्या वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे अपघातांची संख्याही वाढली होती.

वहातूकीच्या दृष्टीने हा मार्ग खडतर झाला होताच. परंतू सातत्याने वाहातूकीची होणारी कोंडी लक्षात घेता या मार्गाचे रूंदीकरण व्हावे, अशी मागणी नागरीकांमधून होत होती. या कामाबाबत आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या माध्यमातून सरकारकडे रस्‍त्‍याच्या रुंदीकरणाच्या कामाचे प्रस्ताव सादर करुन या कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्‍हाण यांनी यासाठी सहकार्य केल्‍याचे आ.विखे पाटील यांनी आवर्जुन नमुद केले. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या संपूर्ण रस्‍त्‍याच्या कामासाठी सुमारे २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे स्पष्ट करुन आ.विखे पाटील म्हणाले, की या उपलब्ध होणाऱ्या निधीतून कोल्हार येथे प्रवरा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून, बाभळेश्वर येथील उड्डाणपुलासाठीही या निधीत तरतूद करण्यात आली आहे.

पिंप्रीनिर्मळ येथे भूयारी मार्ग आणि सर्व्हिस रोडची कामे मार्गी लागणार असून, बाह्यवळण रस्‍त्‍याच्‍या सात किलोमीटर अंतराचे मजबूतीकरण या निधीतून पूर्ण होणार आहे. पूर्वी या मार्गाच्या कामाबाबत सातत्याने निर्माण झालेले अडथळे दूर करण्याचा आपला प्रयत्न सुरुच होता. मंजूर झालेला २३४ कोटी रुपयांचा हा भरीव निधी उपलब्ध होताच प्रशासकीय स्तरावर या कामाची प्रक्रीया वेगाने सुरु होईल असा विश्वास आ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment