Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

मुलीचा प्रेमविवाह आईवडीलांना पडला ‘महागात’ ! ‘या’ मुळे झाला आई-वडिलांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- मुलीने प्रेमविवाह केल्याचे समजताच रागाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, विषारी औषध प्राशन केलेल्या आई-वडिलांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शुक्रवारी दिली.

मुलीने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात आई-वडिलांनी राहुरी तहसील कार्यालयात विषारी औषध प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक बागूल व पोलिस कर्मचाऱ्यांनी या दोघांना तत्काळ नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वेळेवर उपचार झाल्याने जीवाचा धोका टळला. दरम्यान, आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पास काॅन्स्टेबल एस. एस. दिवटे करत आहेत. वांबोरी येथील प्रेमीयुगुल एकाच समाजाचे व सज्ञान आहे. त्यांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close